Join us  

गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, ३ दिवसांत जमवला कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:45 AM

'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे मुख्य भूमिकेत असलेला 'अल्याड पल्याड' हा सिनेमा अलिकडेच चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला. या हॉरर सिनेमाची ट्रेलरपासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. १४ जूनला प्रदर्शित झालेला 'अल्याड पल्याड' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. हा सिनेमासाठी पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची हवा पाहायला मिळत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे. २०० हून अधिक चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. गौरव मोरेच्या अल्याड पल्याड सिनेमाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर १.०७५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा कमाईचे रेकॉर्ड मोडणार का? याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज असलेला 'अल्याड पल्याड' प्रेक्षकांना भावला आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसिनेमा