Join us  

गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी, कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:47 PM

गौरव मोरे मुख्य भूमिकेत असलेल्या 'अल्याड पल्याड' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला. छोटा पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर गौरव आता रुपेरी पडदा गाजवत आहे. गौरव मोरे मुख्य भूमिकेत असलेल्या 'अल्याड पल्याड' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 

'अल्याड पल्याड' या हॉरर सिनेमाची ट्रेलरपासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. हा सिनेमासाठी पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत. १४ जूनला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई करायला सुरुवात केली होती. तीन दिवसांत १.०७५ कोटींचा गल्ला जमवल्यानंतर सात दिवसांत २.१९ कोटींचा बिजनेस अल्याड पल्याडने केला होता. आता सिनेमाचं ११ दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे. 

गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड' सिनेमाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३.६९ कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहून गौरवही थक्क झाला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज असलेला 'अल्याड पल्याड' प्रेक्षकांना भावला आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेतासिनेमासेलिब्रिटी