Join us  

गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनीच घेतल्या हातात काठ्या, पहिल्यांदाच घडलं असं काही की...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 9:32 AM

जुन्नर तालुक्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात असं काय घडलं की महिलांनीच घेतल्या हातात काठ्या

महाराष्ट्रात सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil). तिचा कार्यक्रम म्हणलं की राडा तर होणारच. गावागावात तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. कधीकधी गर्दी आवाक्याच्या बाहेर जाते आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. मात्र जुन्नर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. गौतमीचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा म्हणून गावातील महिलाच हातात काठ्या घेऊन समोरच्या रांगेत बसल्या. 

जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेदरम्यान गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, गोंधळ तर होणारच. पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेजच्या बाजूलाच गावातील महिला हातात काठ्या घेऊन बसल्या. त्यामुळे सर्व तरुणांनी शांतपणे मागे बसूनच कार्यक्रमाचा आनंद घेतला. कोणीही गोंधळ करु नये म्हणून आदिवासी ठाकर समाजाच्या महिलांनी आणि गावातील इतर महिलांनीच सुरक्षेची जबाबदारी चोख पार पाडली. याशिवाय गौतमीचे खाजगी सुरक्षारक्षक, बाऊन्सर्स आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होताच. हातात दंडुका घेतलेल्या महिलांच्या धाकाने का होईना कार्यक्रम सुरळीत पार पडला. गौतमीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच हा असा प्रकार बघायला मिळाला. 

यापूर्वी अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाला आहे. कित्येक वेळा काही हुल्लडबाज तरुणांमुळे तिचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. तसंच करा. धुडगूस घालणाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करायचीही वेळ आली आहे. एकंदर हे सर्व पाहता महिलांच्याच हातात काठ्या देणं सोयीस्करच ठरलं आहे.

टॅग्स :गौतमी पाटीलजुन्नरनृत्य