प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या ती राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय तिच्यावर पाटील आडनावाची बदनामी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलला प्रश्न विचारले असता त्यावर तिने प्रतिक्रिया दिली. नुकतीच गौतमी विरारमध्ये कार्यक्रमासाठी आली होती. त्यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधली आहे.
गौतमी पाटीलने सांगितली की, मी राजकारणात येणार अशी चर्चा सुरू असली, तरी असे काहीही नाही.” मराठा महासंघाने गौतमीवर पाटीलवर आडनावाची बदनामी केल्याचा आरोप केला. याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, मी आता या गोष्टींकडे लक्ष देणार नाही. मला कुणी काहीही बोलते आहे. त्याने मला फरक पडत नाही. मी त्यावर बोलणार नाही.
पाटील आडनाव न वापरण्याचा दिला इशारा
मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पाटील आडनाव लावण्याबाबत थेट इशारा दिला आहे. त्यांनी इशारा देत म्हटलं की, गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही.