Join us

गौतमी पाटीलची गुलिगत किंग सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:24 IST

गौतमी पाटीलने सुरज चव्हाणसाठी खास पोस्ट केली आहे. 

'बिग बॉस'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातून प्रत्येक घरात पोहचलेल्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) याचा आता चित्रपट येतोय. मोबाईलमधील रील, मग टिव्ही आणि आता थेट मोठ्या पडद्यावर सुरज चव्हाण झळकणार आहे. सुरचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुख्य भुमिका असलेला सुरजचा हा पहिलाच चित्रपट आहे. या निमित्तानं त्याच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. त्यातच आता मराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) सुरज चव्हाणसाठी खास पोस्ट केली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गौतमी सध्या सोशल मीडियावर सक्रीय असते. यावर विविध फोटो आणि व्हिडीओ ती पोस्टक करत असते. आताही तिनं सुरजच्या  'झापुक झुपूक' चित्रपटातील गाण्यावर रील बनवून पोस्ट केली आहे. एवढंच नाही तर तिनं सुरजला त्याच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्यात. तिनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "२५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या 'झापुक झुपूक' पिक्चरसाठी खूप खूप शुभेच्छा सूरज. आता सगळ्यांनी सूरजच्या 'झापुक झुपूक' या गाण्यावर नक्की रील्स बनवा. एकदम गोलीगत. आणि हो पिक्चर ला गर्दी करा", असं आवाहन तिनं चाहत्यांना केलं. 

गौतमीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्यात. तिनं सुरजला पाठिंबा दिल्यानं तिचं कौतुकही केलं आहे. गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आता छोटा पडदा गाजवणार आहे. गौतमी पाटील आता स्टार प्रवाहच्या 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. या कार्यक्रमात ती स्वयंपाक करताना दिसणार आहे. गौतमीला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक आहेत

टॅग्स :गौतमी पाटीलसेलिब्रिटीमराठी अभिनेता