Join us

परश्याच्या नव्या हिरोईनचा आहे स्वत:चा व्यवसाय, 'घर बंदूक बिरयानी' फेम सायली पाटीबद्दल हे माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 08:00 IST

Ghar Banduk Biryani Fame Sayli Patil : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. होय, परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे.

Ghar Banduk Biryani Fame Sayli Patil :  सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. होय, परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे. नागराज मंजुळेंचा घर, बंदूक, बिरयानी हा सिनेमा येत्या ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात आकाश ठोसर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात आकाश ठोसरसोबत दिसणार आहे ती सायली पाटील. परश्याच्या या नव्या हिरोईनने सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे.

नागराज मंजुळेंच्याच झुंड या सिनेमात सायली पाटील दिसली होती. झुंड चित्रपटातील तिने भावना भाभीची भूमिका साकारली होती. आता घर, बंदूक, बिरयानी या सिनेमात ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकतेय. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, सायली एक अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमात खुद्द सायलीने हा खुलासा केला. यावेळी तिने तिच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. हो, मी आर्किटेक्चर आहे. माझं स्वत:चं फर्म आहे. मी अपघाताने अभिनेत्री झालेय. मुळात मी आर्किटेक्चर आहे. मी अजूनही काम करते,असं ती म्हणाले.

तुम्हाला ठाऊक आहेच की, सायलीनं नागराज यांच्या सैराट या चित्रपटासाठीही ऑडिशन दिलं होतं. यावेळी सायली पुण्यात आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होती. सैराटसाठी जवळपास तिचं नाव फायनल झालं असताना तिने स्वत: आर्चीच्या भूमिकेला नकार दिला होता. तो विषय तिच्यासाठी तेव्हाच कट झाला होता. पणझुंडच्या वेळी मात्र नागराज यांना हमखास सायलीची आठवण झाली. भावना भाभीची भूमिका ती उत्तम करू शकते, असा विश्वास नागराज यांना होता.

नागराज यांनी झुंडसाठी सायलीला फोन केला, तेव्हा क्षणभर तिचा विश्वासच बसेना. नागराज आपल्याशी बोलताहेत, त्यांनी मला कॉल केला, हे जणू तिला स्वप्न वाटत होतं.नागराज सरांनी मला फोन केला, तेव्हा मला खरंच वाटत नव्हतं. माझे मित्र माझ्यासोबत प्रॅन्क करत आहेत, असंच क्षणभर मला वाटलं होतं, असं तिने सांगितलं.  सायली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. रिअल लाईफमध्ये सायली प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती स्वत:चे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आकाश आणि सायलीशिवाय घर बंदूक बिरयानी या सिनेमात स्वत: नागराजही अभिनय करताना दिसणार आहे. ते एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. सयाजी शिंदे हेही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.   

टॅग्स :सायली पाटीलआकाश ठोसरनागराज मंजुळेमराठी अभिनेतामराठी चित्रपट