सध्या 'घरत गणपती' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. 'घरत गणपती' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकप्रिय कलाकारांची स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची गाणी आणि ट्रेलरने प्रेक्षकांंचं चांगलं प्रेम मिळवलं. 'घरत गणपती' सिनेमात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री निकिता दत्ता प्रमुख अभिनेत्री म्हणून झळकत आहे. 'कबीर सिंग'सारखा सुपरहिट सिनेमा केल्यानंतरही निकिता बॅकफूटवर का राहिली, याचा खुलासा तिने केलाय.
कबीर सिंग रिलीजनंतर पाच सिनेमे आलेच नाहीत: निकिता
निकिताने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला की, "कबीर सिंगच्या रिलीजनंतर माझ्याकडे पाच सिनेमे होते. पण नंतर लॉकडाऊनमुळे खूप परिणाम झाला. यापैकी फक्त दोन सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले. याशिवाय दोन सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले. एका सिनेमाची रिलीज डेट तब्बल तीन वर्ष पुढे ढकलण्यात आली." असं म्हणत तिने PR करण्यावर कधी लक्ष केंद्रीत केलं नाही याचाही खुलासा केला.
जेव्हा सैराट रिलीज झाला तेव्हा...: निकिता
निकिताने मुलाखतीत पुढे सैराटचं उदाहरण दिलं. निकिता म्हणते, "मी कधी प्रादेशिक भाषेच्या सिनेमात काम करेल याचा विचार मी केला नव्हता. कारण मी सुरुवातीपासून हिंदी माध्यमात कार्यरत आहे. पण जेव्हा घरत गणपती सिनेमा आला तेव्हा मला सिनेमाची कल्पना आवडली. मी सिनेमा जास्त संवाद हिंदीत बोलले आहे. जोवर एखाद्या सिनेमाबद्दल बोललं जात नाही तोवर लोक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरकडे वळत नाहीत. सैराटबद्दलही असंच झालं होतं. त्यामुळेच मी सैराट थिएटरमध्ये पाहिला होता" निकिताची प्रमुख भूमिका असलेला 'घरत गणपती' सिनेमा २६ जुलैला रिलीज झालाय.