Join us

मानव्य संस्थेला फुगे च्या टीमने दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2017 11:16 AM

स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या खूपच रंगत आहे. ...

स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या खूपच रंगत आहे. तसेच या चित्रपटाची चर्चादेखील प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टीमन मानव्य संस्थेला भेट दिली आहे.  फुगे हे आनंदाचे प्रतिक असल्यामुळे लोकांना आनंदी राहण्याचा संदेश फुगे या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटाची टीम देत आहे, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष फुग्यांचे वाटप या चित्रपटाची टीम करत आहे. याच योजनेअंतर्गत फुगेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील एच. आय.व्ही. पिडीत मुलांचे संगोपन करणाºया मानव्य या एनजीओमध्ये सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाºया मुलांना गायक स्वप्नील बांदोडकरने गायनाचे धडे देखील दिले.                   पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या त्याच्या म्युजीकल इंस्टीटयूट मधील एक प्राध्यापक महिन्यातून एकदा या संस्थेतील मुलांना गायनाचे धडे मोफत शिकवण्यास येईल, असे आश्वासन त्याने दिले, तसेच अगर मला वेळ मिळाल्यास मीदेखील इथे मार्गदर्शन देण्यास हजर राहत जाईल, असेही त्याने पुढे सांगितले. मानव्य संस्थेतील मुलांनी देखील आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, मोठ्या उत्साहात फुगे टीमसोबत काही क्षण घालवले. अशाप्रकारे प्रेम आणि मैत्री यावर भाष्य करणारा हा चित्रपट १० फ्रेबुवारीला प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेर, नीता शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच बॉलिवुडचा तगडा दिग्दर्शक निशिकांत कामतदेखील या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बºहान कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.