Join us  

​गोवा ९व्या मराठी फिल्म फेस्टिव्हलसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2016 10:11 AM

२००८ साली गोवामध्ये मराठी फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट दाखविले जातात. सुरुवातील या फेस्टिव्हलला ...

२००८ साली गोवामध्ये मराठी फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट दाखविले जातात. सुरुवातील या फेस्टिव्हलला महेश मांजरेकरपासून नाना पाटेकर ते रिमा लागूपासून पुजा सावंतने भेट दिली आहे. यंदाचं हे ९वे वर्ष आहे.  ३ जून ते ५ जून दरम्यान या फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेली व अजून प्रदर्शित होणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहे. फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणा-या चित्रपटांच्या यादीमध्ये सैराट, भो-भो, परतु, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, रिंगण, हलाल, रंगा पतंगा, राजवाडे अँड सन्स, कौल, वक्रतुंड महाकाय, दमलेल्या बाबाची कहानी, एनिमी (कोंकणी), डॉट कॉम मॉम, दि सायलेन्स अँड बिस्कीट या चित्रपटांचा समावेश आहे.