अच्छे दिन आ गये है..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:10 AM
वैविध्यपूर्ण सामाजिक आणि संवेदनशील विषय.. उत्तम मांडणी. सादरीकरण या वैशिष्ट्यांमुळे मराठी चित्रपटाची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे. 'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'नंतर ...
वैविध्यपूर्ण सामाजिक आणि संवेदनशील विषय.. उत्तम मांडणी. सादरीकरण या वैशिष्ट्यांमुळे मराठी चित्रपटाची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे. 'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'नंतर आता 'कोर्ट' चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात आजवर 'ऑस्कर'ची मोहोर एकदाही मराठीवर उमटलेली नसली तरी या पुरस्कारांच्या यादीत मराठी चित्रपटाचाही समावेश असावा, अशा तर्हेची एक सकारात्मक मानसिकता भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये तयार होऊ लागली आहे, ही मराठी जनांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. एक काळ असा होता, की मराठी चित्रपटाचा प्रेक्षक विनोदाच्या कंटाळवाण्या फोडणीतून तयार झालेल्या रटाळ 'मनोरंजना'च्या जाळ्यात अडकला होता.. मात्र त्याच त्याच धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षक कंटाळू लागले होते. प्रेक्षकांनी जवळपास मराठी चित्रपटांकडे पाठच फिरविण्यास सुरुवात केली होती.. अशा परिस्थितीत 'श्वास' ने मराठी चित्रपटसृष्टीला जीवदान दिले. तिथूनच चित्रपटांच्या रिळमधून सृजनशीलतेचे नवनवीन आविष्कार बाहेर पडत गेले आणि मराठीत राष्ट्रीय पुरस्कारांची 'कमळं' पुन्हा नव्याने फुलू लागली. दिवसागणिक चित्रपटांचा हा 'कॅनव्हास' उंचावू लागल्यामुळे आज केवळ बॉलिवूडकरांनाच नव्हे, तर हॉलिवूडलाही मराठीचा रुपेरी पडदा खुणावू लागला आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर म्हणा किंवा अभिनयाची डाळ शिजली नाही तरीही अशा कलाकारांना अभिनयाची भूक स्वस्थ बसू देत नसल्यामुळे आपोआपच 'टॉलिवूड'चा रस्ता त्यांना दिसायला लागतो आणि त्या मार्गक्रमणावरच त्यांची गाडी सुसाट पळायला लागते..पण आता एक मराठीची चोखंदळ पाऊलवाटही ते निवडू पाहत आहेत, हे मराठीचे यशच म्हणावे लागेल.आता हेच पहा ना, बॉलिवूडचा शहेनशहा 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनीही अमिताभ बच्चन कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 'विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली.. गिरीश आणि उमेश या द्वयीने साकारलेल्या या चित्रपटाने विविध महोत्सवांमध्ये आपल्या पसंतीची मोहोर उमटविली. बिग बींच्या पावलावर पाऊल टाकत अजय देवगण यानेही मराठी निर्मिती क्षेत्रात दमदार एंट्री करीत 'विटी दांडू' खेळायला प्रेक्षकांना भाग पाडले. ''स्टंटमॅन' अक्षयकुमार आणि अश्विनी यार्दी यांनी निर्मित केलेल्या आणि स्मिता तांबे हिच्या अभिनयाने सजलेल्या '72 मैल; एक प्रवास' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. यांसारख्या काहीशा कलात्मक चित्रपटांनी विविध महोत्सवांमध्ये स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले, तर दुसरीकडे 'मुंबई पुणे मुंबई', 'तू हि रे', 'डबल सीट', 'कट्यार काळजात घुसली', 'मुंबई पुणे मुंबई 2' यांसारख्या व्यावसायिक चित्रपटांनीही 'बॉक्स ऑफिस'चे आकडे कोटीच्या घरापर्यंत पोहोचविले. यंदाच्या दिवाळीमध्ये सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'ला देखील काट्याची टक्कर देत 'कट्यार काळजात घुसली', 'मुंबई पुणे मुंबई 2' या दोन चित्रपटांनी घवघवीत यश मिळविले. कट्यारमध्ये तर शंकर महादेवन, साक्षी तंवर, अजिर्त सिंग या अमराठी कलाकारांचेही दर्शन घडले. 'परिणिता', 'अधुरी एक कहानी' यांसारख्या चित्रपटांमधून स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केलेली विद्या बालनने 'एक अलबेला' हा मराठी चित्रपट स्वीकारून आणि सलमान खानने 'लय भारी'मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका करून मराठमोळ्या प्रेक्षकांना काहीसा सुखद धक्का दिला. फू'६ी''>ल्लें१ं३ं.स्रँंल्ल्रि२''ें३.ूे/फू'६ी''> फू'६ी''>ऋीं३४१ी/फू'६ी''>