Good news! प्रिया बापटच्या आयुष्यात आगमन झाले या खास व्यक्तीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 10:59 AM
प्रिया बापटच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे पदार्पण झाले असून तिनेच ही गोष्ट तिच्या फॅन्सना सोशल मीडियाच्या मार्फत सांगितली आहे. ...
प्रिया बापटच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे पदार्पण झाले असून तिनेच ही गोष्ट तिच्या फॅन्सना सोशल मीडियाच्या मार्फत सांगितली आहे. प्रियाने एका छोट्याशा बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. हा फोटो पाहिल्यावर प्रियाच्या आयुष्यातील हा नवीन सदस्य कोण आहे हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल.प्रिया गरोदर असल्याचे कधी ऐकिवात देखील आले नव्हते. असे असताना प्रियाच्या आयुष्यात हे छोटेशे बाळ कुठून आले हा प्रश्न सगळ्यांनाच नक्कीच पडला असेल. प्रिया बापट आई नव्हे तर मावशी बनली आहे. तिनेच ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. प्रियाला एक छोटी बहीण असून तिची छोटी बहीण श्वेताने एका गोंडस मुलीला नुकताच जन्म दिला आहे. प्रियाने तिच्या भाचीसोबतचा एक फोटो शेअर केला असून तिच्या भाचीचे नाव शरिवा आहे. तिच्या चिमुकल्या हातांमध्ये प्रियाने आपले बोट दिल्याचे फोटोत आपल्याला पाहायला मिळत आहे. ट्विटर वर पोस्ट केलेल्या या फोटोला कॅप्शन देत प्रियाने लिहिले आहे की, ‘माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती सोबतचा खास क्षण’. यासह तिने #neice #love #shariva हे हॅशटॅग्जही देखील दिले आहेत. या तिच्या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी हा फोटो लाइक केला आहे. प्रिया बापटची बहीण सेलिब्रिटींची स्टायलिस्ट असून प्रिया अनेक वेळा तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्यासोबत फोटो पोस्ट करताना आपल्याला दिसते. प्रिया बापटने शुभंकरोती, दामिनी, अधुरी एक कहानी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच वजनदार, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, टाइम पास, काकस्पर्श यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुन्नाबाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नवा गडी नवा राज्य हे तिचे नाटक देखील प्रचंड गाजले होते. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी तिला एक मानले जाते. Also Read : उमेश कामतला नव्हे तर या गोष्टीला प्रिया बापट करतेय मिस