नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सुबोध भावे(Subodh Bhave)च्या संदर्भात मोठी बातमी समोर येते आहे. म्हणे, सुबोध भावेने अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी जॉईन केली आहे. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्याचे चाहते संभ्रमात पडले आहेत. सुबोधने असे पाउल का उचलले आहे, याची काळजी त्याच्या चाहत्यांना वाटते आहे.
सुबोध भावे अमेरिकेत स्थायिक झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. १५ दिवसांपासून तो अमेरिकेतच होता. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता त्याने मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि लिहिले की, नुकताच मायक्रोसॉफ्टमध्ये जॉईन झालो. आमच्याकडे "विंडोज" बसवून मिळतील. सुबोधच्या या पोस्टनंतर चाहत्यांना त्याने अभिनयाला रामराम केला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
या दौऱ्यावर असताना सुबोध भावेने मायक्रोसॉफ्ट कंपनीलाही भेट दिली. त्यावेळी हा फोटो क्लिक करून त्याने सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या फोटोवर मजेशीर कमेंट्स वाचायला मिळत आहेत.