Join us

सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:32 IST

गुलकंद टीमने सक्रांतीनिमित्त सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज करुन रिलीज डेटही जाहीर केलीय (gulkand)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडता शो. या शोमधील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आता प्रेक्षकांसाठी एक सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं नाव आहे 'गुलकंद'.  काही दिवसांपूर्वी 'गुलकंद' या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हीच उत्सुकता कायम ठेवत आज संक्रांतीनिमित्त 'गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय रिलीज डेटही जाहीर केलीय.

'गुलकंद'मध्ये कलाकारांची हटके जोडी

 'गुलकंद' सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालंय. ते पाहून मात्र प्रेक्षकवर्गात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरमध्ये सई, समीर, प्रसाद आणि ईशा यांचे पतंग आकाशात उंच भरारी घेताना दिसत असतानाच यात काही गुंतागुंतही दिसत आहे. कधी समीर आणि सईची पतंग एकत्र दिसत आहे तर कधी प्रसाद आणि सईची पतंग उडताना दिसत आहे. मध्येच समीर आणि ईशाची पतंगही भरारी घेताना दिसत आहे. त्यामुळे कोणाची पतंग कुठे चालली आहे, हे बघायला मजा येणार आहे.

कधी रिलीज होणार 'गुलकंद'?

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरसमीर चौगुलेप्रसाद ओक मराठी अभिनेतामराठी चित्रपट