दुष्काळामुळे शेतक-यांची होणारी कुचंबना व त्यातुन आत्महत्येकडे झुकणारा शेतकरी अशा परीस्थितीवर भाष्य करणारी मिलींद पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली कथा सुनिल झवर यांना खुप आवडली यातुनच त्यांनी "जी.एस.फिल्म प्राँडक्शन"च्या माध्यामातून निर्मिती करण्याचे ठरविले आणि हळुहळु "H2O" या चित्रपटाने गती घेतली तर चित्रपट क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व व या चित्रपटाचे लेखक असलेले मिलींद पाटील यांनी दिग्दर्शनाची धुरा स्वताच्या खांद्यावर घेतली.
"H2O म्हणजे पाणी" व "पाणी म्हणजे जीवन" हे या चित्रपटाचे ब्रीद असुन या चित्रपटाचा विषयच मुळी काळजाला हात घालणारा असुन अनेक दिवसांनी एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे.
जिथे माणसालाच पाणी नाही तिथे जनावरांना कुठुन आणणार हा यक्ष प्रश्न ही असल्याने "पाण्यासाठी दाही दिशा" अशी परीस्थिती आज सगळीकडे असताना त्यावर मात करण्यासाठी एक चळवळ म्हणुन एकवटणारी तरुणाईचं आशादायी चित्रण या चित्रपटात आहे त्यामुळे तो शेवटी सुखद वाटतो. खरच आज समाजातील असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तरुणाईची खरी गरज आहे यावर हा चित्रपट अधोरेखित करतो. पर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभं केले आहे.