सांस्कृतिक आणि प्रेमाचा वारसा जपणारं 'हंपी'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 07:29 AM2017-11-16T07:29:45+5:302017-11-16T12:59:45+5:30
'युनेस्को' नं, 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून जाहीर केलेलं कर्नाटकातील एक अतिशय सुंदर शहर म्हणजे 'हंपी'. शेकडो वर्षांचा दैदिप्यमान इतिहास ...
सध्या, विविध कारणांमुळे एकाकीपणा, नैराश्य आणि ताणतणाव या गोष्टी माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आपलंसं करणारं कुणी तरी हवं असतं. मग ती वेगळेगळ्या वळणावर भेटणारी माणसं असू शकतात किंवा चक्क एखादं ठिकाणही असू शकतं ! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा आशयाच्या हंपी या चित्रपटातील हंपी हे शहर नैराश्यावर चक्क फुंकर मारत राहतं. 'सगळी माणसं वाईटच असतात' असं म्हणणाऱ्या ईशाला (सोनाली कुलकर्णी) हंपी आणि तिथे भेटलेली माणसं बदलवू शकतात का, हा एक कुतूहलाचा विषय आहे.
अतिशय सुंदर गाभा असलेल्या या चित्रपटाची निर्मिती योगेश भालेराव यांच्या ‘स्वरूप समर्थ एंटरटेनमेंट’ आणि अमोल जोशी प्रॉडक्शन, यांची असून ‘स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडीया प्रा. लि.’,आकाश पेंढारकर, सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी बरोबर ललित प्रभाकर,प्राजक्ता माळी,प्रियदर्शन जाधव व छाया कदम यांचाही अतिशय ताकदीचा अभिनय चित्रपटाला ‘हंपी’ इतकच सुंदर करतो.चित्रपटातील गाणी वैभव जोशी आणि ओंकार कुलकर्णी यांनी लिहिली असून नरेंद्र भिडे आणि आदित्य बेडेकर यांनी संगीत साज चढविला आहे. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या प्रेमात पडायला शिकवणारा हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट बघणे म्हणजे एक अद्भुत अनुभव असणार हे नक्की.