अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वोत्तम आणि अनुरुप जोडी समजली जाते. दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात शिवाय दोघांचं एकमेकांशी चांगलंच पटतं. मराठी चित्रपटसृष्टीतील ही जोडी सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमधून ती पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना दोघं काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात. नुकतंच मृण्मयीने पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. अभिनेत्री मृण्मयी पतीसोबत कॅण्डिड क्षणाचा आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोला मृण्मयीने कॅप्शनही दिले आहे. “आणि सुट्ट्यांना सुरूवात… बऱ्याच दिवसांपासूनची प्रतीक्षा..”
मृण्मयीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले आहे. व्यावसायिक स्वप्नील रावसह मृण्मयी 3 डिसेंबरला शुभमंगल पार पडले होते. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मृण्मयी आणि स्वप्नील यांचा पेहरावसुद्धा तितकाच खास होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते. नवरी इतकी नटून थटून तयार असताना नवरदेव स्वप्नीलसुद्धा मागे कसा राहिल. त्याने खास पेशवे स्टाईलमध्ये पगडी आणि कपडे परिधान केले होते. या लग्न सोहळ्याला मृण्मयीचे चित्रपटसृष्टीतील खास मंडळींनी हजेरी लावली. मृण्मयी आणि स्वप्नीलचे हे अरेंज मॅरेज आहे.
आपल्या अभिनयाने मृण्मयीने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा मग रुपेरी पडदा, मृण्मयीने रसिकांवर जादू केली आहे. 'कट्यार काळजात घुसली' आणि 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून मालिकांसोबतच मृण्मयीने कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट या सिनेमातही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.