ज्या अभिनेत्या प्रती प्रेक्षकांकडून आपलेपणाची भावना आहे तो अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. आज मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस. मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनसाठी ते जास्त प्रसिध्द आहेत. तसेच विनोदी अभिनयासाठी त्यांची ओळख फार आहे. ‘डँबिस’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आणि गोष्ट छोटी डोंगराऐवढी, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली.
नागपूर अधिवेशन, रंगा पतंगा, कापूस कोंड्याची गोष्ट. शासन, झबरदस्त, हापूस आदी मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तर वास्तव:दि रिएलिटी, जिस देस में गंगा रेहता है, प्राण जाये पर शान ना जाये, माय फ्रेण्ड गणेशा ३ आदी हिंदी चित्रपटांत काम केले आहे. तसेच बेधुंद मनाच्या लहरी, गंगुबाई नॉन मॅट्रिक, तिसरा डोळा यांसारख्या मालिकांसाठी टेलिव्हिजनवर देखील ते प्रसिध्द आहेत.
अभिमानाची बाब म्हणजे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी मदत म्हणून नाम फाऊंडेशऩची स्थापना केली.
सुपर टॅलेंटेड आणि माणुसकी जपणारा अभिनेता मकरंद अनासपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!