छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. सायलीला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. सायलीने ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधलं फोटोशूट शेअर करत सर्व महिलांना जागतिक महिलांनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये सायलीने ब्लॅक रंगाच्या ड्रेसवर गॉगल लावले आहे. सायलीच्या चाहत्यांना ही तिचा हा स्वॅग अवतार आवडला आहे. चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकथा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.
मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. या मालिकेनंतर सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती.