बरोबर महिनाभरापूर्वी आजच्याच तारखेला मराठी इंडस्ट्रीतलं एक लोकप्रिय कपल लग्नबेडीत अडकलं होतं. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole ) व अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) यांच्याबद्दल. होय, गेल्या 3 मे रोजी दोघांचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. आज 3 जून रोजी या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. शिवानीच्याच शब्दांत सांगायचं तर अगदी डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच महिना झाला.लग्नाला महिना झाल्याचं सेलिब्रेशन तर बनतंच. लग्नाला महिना पूर्ण होताच शिवानीने लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काही धम्माल क्षण आहेत, काही भावुक करणारे क्षण आहेत. विराजसनेही लग्नाला महिना होताच लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
शिवानी व विराजसच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर विराजस व शिवानीच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडलं होतं.
शिवानी व विराजस दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची ओळख झाली होती. या नाटकाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मग ही मैत्री प्रेमात बदलली.