Join us

हर्षी शर्मा साकारतेय रमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 4:44 AM

पुणे जसे विद्येचे माहेरघर तसेच कलाकारांचे देखील आता माहेरघर ठरत आहे. पुण्यामधून नाव लौकिक मिळवलेल्या कलाकारांची संख्या कमी नाही. ...

पुणे जसे विद्येचे माहेरघर तसेच कलाकारांचे देखील आता माहेरघर ठरत आहे. पुण्यामधून नाव लौकिक मिळवलेल्या कलाकारांची संख्या कमी नाही. हर्षी शर्मा देखील त्यातली एक ठरली आहे. हर्षी अमराठी असली तरी ती सध्या मराठीत चांगलीच रुळली आहे. लवकरच तिचा प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्स प्रस्तुत डॉ. जितेंद्र राठोड निर्मित, रमेश रोशन सह निर्माते असलेला गडबड झाली नावाचा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे.या सिनेमाचे दिग्दर्शक संतराम असून सिनेमाला रमेश रोशन यांचे संगीत लाभले आहे. सिनेमात सिनेमात राजेश शृंगारपुरे, नेहा गद्रे, विकास पाटील, उषा नाडकर्णी, मोहन जोशी, संजय मोहिते, हर्षा गुप्ते, प्रमोद शिंदे, निरंजन नलावडे, हर्षी शर्मा, प्रतिभा भगत यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. सवांद अनिल पवार आणि निर्मिती प्रमुख अजय सिंग.एक रिश्ता साझेदारी का? या हिंदी मालिकेनंतर योगायोगाने मराठी सिनेमा कसा मिळाला याबद्दल हर्षी सांगते कि, माझ्या एका मैत्रिणीने माझे फोटो सिनेमाच्या दिग्दर्शकाला पाठवले होते. त्यांना आवडले म्हणून त्यांनी मला बोलावून घेतले. सुरुवातीला सिनेमातील शीर्षक गाण्यासाठी माझी निवड करण्यात आली मग सिनेमातील रमा नावाची भूमिका देखील मला मिळाली. राजेश शृंगारपुरेच्या घरात काम करणारी ही रमा गोंद्याची (संजय मोहिते) बायको आहे. गोंद्या आणि तिच्यात नेहमी छोटीछोटी भांडणं होत असतात. याशिवाय सिनेमात मी शीर्षक गाण्यात आहे.मराठी बोलण्याची अडचण झाली का यावर हर्षी सांगते की, मी अमराठी असली तरी शाळेत मराठी विषय होतेच आणि महाराष्ट्रात राह असल्याने थोडी फार मराठी तर येतेच. सिनेमातील एका दृश्यात मला विजार बोलण्याच्या आधी एक वेगळा शब्द देण्यात आला होता पण त्याचा उच्चार काही वेगळाच होत असल्याने मला विजार शब्द देण्यात आला. संजय मोहिते यांनी मला मराठी बोलण्यासाठी विशेष सहकार्य केले.