मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत.
सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. अभिनयात छाप पाडणा-या आणि "टाइमपास' सिनेमामुळे ‘दगडू’ म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता प्रथमेश परबनेही त्याच्या लूकवर प्रचंड मेहनत घेतल्याचे तुम्हालाही जाणवले. 'बालक पालक', 'टाइमपास' या सिनेमांमुळे तो स्टार बनला. मात्र त्याचा हा प्रवसा खडतर परिस्थितीशी झगडत झालाय. संघर्ष त्यालाही चुकला नाही. आपल्या अभिनयानेच त्याने स्वतःला सिद्ध करत रसिकांची मनंही जिंकली आहे. आज प्रथमेश परबचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
अभिनयाप्रमाणे आता प्रथमेश स्टाइलच्या बाबतीतही सजग झाला आहे. सोशल मीडियावर प्रथमेशचे सध्याचे फोटो पाहायला मिळतील. नवीन अंदाजातील फोटो पाहून त्याच्या लूकमध्ये झालेला बदलही तुमच्या लक्षात येईल. नवीन लूक मिळवण्यासाठी त्याने बरीच मेहनतही घेतली आहे. त्याच्या या नवीन लूकनेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रथमेशचा बदललेला लूक. रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल यामुळे चाहत्यांसाठी आकर्षणही ठरत आहे. सोशल मीडियावर तो प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो.
साचेबद्ध कामात न अडकता नवनवीन भूमिका करण्याकडे त्याचा जास्त कल असतो. दिलेल्या एका मुलाखतीत प्रथमेशने सांगितले होते की, वेगळ्या प्रकारची भूमिका करण्याचा विचार अनेकदा करत असतो.अशी आव्हानात्मक भूमिका आल्यास ती साकारण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.
भविष्यात मला सचिन तेंडुलकरची भूमिका साकारायला आवडेल. सचिन व्यक्ती म्हणून मला खूप आवडतो, त्यामुळे त्याची भूमिका मला करण्याची इच्छा आहे. संधी मिळाल्यास अशी भूमिका साकारण्याची ईच्छा असल्याचे त्याने सांगितले होते.