Join us

अभिनेता प्रसाद ओकच्या २ वर्षांच्या लेकीला पाहिलंत का?, बर्थडेच्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:28 IST

Prasad Oak : प्रसाद ओकनं सोशल मीडियावर लेकीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याची वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. अतिशय कष्टाने प्रसाद ओकने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केले. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान प्रसाद ओकची लेक दोन वर्षांची झाली आहे. आता त्याला दोन वर्षांची लेक आहे, हे वाचून बुचकळ्यात पडला असाल ना. तर ही दोन वर्षांची लेक म्हणजे त्यांच्याकडील कुत्र्याचं छोटं पिल्लू मस्कारा. 

प्रसाद ओकनं सोशल मीडियावर मस्काराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, हॅप्पी बर्थडे मस्कारा. लव्ह यू. त्याच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, सुंदर मुलगी. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हॅप्पी बर्थडे मस्कारा. प्रसादचे चाहते मस्काराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी नेहमीच मस्कारासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. इतकेच नाही मस्कारा ओक नावाने तिचे देखील सोशल मीडिया अकाउंट आहे. या अकाउंटवर तिचे क्युट फोटोशूटही पाहायला मिळत आहे. ते तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करत आहेत. तिला ते स्विमिंगसाठी नेतात. तर कधी बीचवरदेखील फिरायला घेऊन जातात. काही महिन्यांपूर्वी ते मस्काराला व्हॅकेशनसाठी ट्रेनने कोकणात गेले होते. तिथल्या प्रवासाची झलक आणि अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.  त्यांच्यात खूप छान बॉण्डिंग पाहायला मिळते. 

टॅग्स :प्रसाद ओक