अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) हे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल आहेत. त्या दोघांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अशोक आणि निवेदिता सराफ यांना एक मुलगा असून त्याचं नाव आहे अनिकेत. तर त्यांना एक मुलगीदेखील आहे. माहित आहे का, तुम्हाला तिच्याबद्दल. अहो, आम्ही सायली संजीवबद्दल बोलत आहोत. निवेदिता आणि अशोक सराफ यांनी सायलीला आपली मुलगी मानलं आहे. तीदेखील त्या दोघांना मम्मी पप्पा म्हणते. नुकतेच निवेदिता सराफ आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यात एकत्र आल्या होत्या. त्यावेळी त्या दोघांमध्ये खूप छान बॉण्डिंग पाहायला मिळाला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेत्री सायली संजीव सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या दोघी एकत्र पाहायला मिळाल्या. भेटल्यानंतर त्या दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतली. एकमेकांच्या पप्प्या घेतल्या. इतकेच नाही तर सायलीने निवेदिता सराफ यांचे कौतुकही केले. तारांगणशी बोलताना निवेदिता सराफ यांनी सांगितले की, अशोक सराफ यांना माझाही नंबर तोंडपाठ नाही. पण सायलीचा नंबर पाठ आहे. मुली वडिलांसाठी असंच करतात.
सायलीने निवेदिता सराफ यांचे केलं कौतुक
पुढे सायली म्हणाली की, बापरे मला खूप अभिमान वाटतो. पप्पांना पद्मश्री मिळाला, मम्माला जीवनगौरव मिळाला. ती आता माझी मम्मा पण वाटणार नाही. इतकी ती तरुण आहे. तिच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. ती मालिका करते, चित्रपटाचे प्रमोशन करते आणि इतकेच नाही तर चित्रपटाच्या प्रीमियरला जाते. सगळीकडे असते.
वर्कफ्रंटसायली संजीवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती ओले आले सिनेमात पाहायला मिळाली. त्यानंतर आता लवकरच ती स्टार प्रवाह वाहिनीवरील एका नव्या मालिकेत काम करताना दिसणार आहे. तर निवेदिता सराफ सध्या आई बाबा रिटायर होत आहेत मालिकेत काम करताना दिसत आहेत.