'टाईमपास' (timepass) या चित्रपटातून तुफान लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब (prathmesh parab). 'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर हैं', हा त्याचा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील त्याची आणि प्राजूची लव्हस्टोरी चांगलीच हिट झाली. या चित्रपटात केतकी माटेगांवकरने प्राजूची भूमिका साकारली होती. या दोघांच्या जोडीला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली. परंतु, रिअल लाइफमध्ये प्रथमेशची प्राजू कोणी तरी दुसरीच आहे. अलिकडेच प्रथमेशने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
मागील वर्षी दिवाळीमध्ये प्रथमेशने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून प्रथमेश सातत्याने चर्चेत येत आहे. प्रथमेश क्षितीजा घोसाळकरला (kshitija ghosalkar) डेट करत असून तिच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक रोमॅण्टिक पोस्ट शेअर केली आहे.
अलिकडेच प्रथमेशने क्षितीजासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कुठे तरी बाहेर फिरायला गेल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने क्षितीजाला शुभेच्छा दिल्या आहेत.
'निरागसता', तुझं सौंदर्य, अशीच हसरी जगत रहा, कधी शहाणपण - कधी लहानपण, निखळ निर्मळ वागत रहा !! तुला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा', अशा गोड शब्दांत प्रथमेशला क्षितीजाला शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान, प्रथमेशच्या या पोस्टवर कमेंट करत शिक्षीजाने त्याला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.