Join us

​भुषण प्रधानची व्यायामाची नवी स्टाइल तुम्ही पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 10:10 AM

​भुषण प्रधानने व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइटला पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे भुषणने व्यायाम करण्याची एक आगळीवेगळी पद्धत त्याच्या फॅन्सना सांगितली आहे.

भुषण प्रधान नेहमीच त्याच्या व्यायामाच्या बाबतीत सतर्क असतो. मराठीतील हँडसम अभिनेत्यांपैकी एक तो आहे. तो पिळदार शरीरयष्ठीसाठी नेहमीच जिममध्ये अनेक तास घाम गाळत असतो. त्याच्या सिक्स पॅक्स अॅबची तर नेहमीच चर्चा असते. भुषण अनेकवेळा त्याचे वर्कआऊट करतानाचे फोटो फेसबुकला पोस्ट करत असतो. त्याने नुकताच व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइटला पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओला त्याच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.भुषणने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी त्याला लाइक केले आहे तर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओद्वारे भुषणने व्यायाम करण्याची एक आगळीवेगळी पद्धत त्याच्या फॅन्सना सांगितली आहे.भुषणने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला तो व्यायाम करताना दिसत आहे. पण भुषण कोणत्याही डम्बलसच्या साहाय्याने नव्हे तर दोन मोठे फणस हातात घेऊन व्यायाम करत आहे. घराच्या मागच्या बाजूला मी व्यायाम करत आहे असेदेखील त्याने या व्हिडिओसोबत लिहिले आहे.आजची पिढी ही व्यायामाच्या बाबतीत प्रचंड सतर्क असते. त्यासाठी ते कितीही पैसे जिममध्ये भरायला तयार असतात. पण भुषणने अगदी कमी पैशांत आणि घरातल्या घरात व्यायाम करण्याचा खूप चांगला पर्याय तरुणांना दिला आहे. भुषण प्रधानने कुंकू, पिंजरा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. संस्कृती बालगुडेसोबतची त्याची पिंजरा ही मालिका प्रचंड गाजली होती. भुषण मालिकांसोबत अनेक चित्रपटांमध्येदेखील झळकला आहे. त्याने टाइमपास, कॉफी आणि बरेच काही, टाइम बरा वाईट यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भुषणचा काही महिन्यांपूर्वी शिव्या हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या तो त्याच्या एका चित्रपटावर काम करत आहे.