Join us

'गाव नसणं म्हणजे आई- वडील...', हेमांगी कवीनं गावाकडच्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:50 PM

Hemangi Kavi : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी सतत चर्चेत येत असते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सतत चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकते. दरम्यान आता तिने गावाकडील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. 

हेमांगी कवीचं गाव साताऱ्यातील म्हसवड येथे आहे. नुकतीच ती गावाला गेली होती आणि तिथले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, जगात, देशाबाहेर किती ही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा. आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है!

ती पुढे म्हणाली की, जेव्हा मला कुणी सांगतं की त्यांना गावच नाही तेव्हा मला कसंसच होतं. लहानपणी प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते! काही जण येऊन- राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत. गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं वाटतं मला. मी खरंच भाग्यवान, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे! त.टी. : कपड्यांवरून कुणाची कसलीही मापं काढू नयेत ही मंडळातल्या काही सदस्यांना नम्र विनंती.

टॅग्स :हेमांगी कवीसातारा परिसर