परदेशातही वजनदार हीट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2016 04:24 PM2016-12-02T16:24:30+5:302016-12-02T16:24:30+5:30
मुळातच शरीराने बारीक असणे म्हणजेच सुंदर अशी समाजात मानसिकता असताना वजनदार हा चित्रपट स्वत:बद्दल वेगळा विचार करायला प्रवृत्त करतो. ...
म ळातच शरीराने बारीक असणे म्हणजेच सुंदर अशी समाजात मानसिकता असताना वजनदार हा चित्रपट स्वत:बद्दल वेगळा विचार करायला प्रवृत्त करतो. स्वत:वर प्रेम करा आणि स्वत:ची काळजी घ्या हा विचार खूप परिमाणकारकपणे या चित्रपटात मांडला आहे. त्यामुळे हा चित्रपट परदेशातही हीट होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. ११ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या, निमार्ती विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या, 'वजनदार' चित्रपटाचे महाराष्ट्राबरोबरच अमेरिकेतही जोरदार वजन पडत आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना स्वत:वर प्रेम करायला शिकवणारा असून, चित्रपटाच्या या सुंदर विषयामुळे भारता बाहेरही चित्रपटाला जोरदार मागणी आली आहे. अमेरिकेतील बे एरिया आणि शिकागो येथे दाखवण्यात आलेला हा चित्रपट तेथील लोकांना खास भावला असून, लोकाग्राहस्तव अमेरिकेतील, डेनवर, डेट्रॉइट, सियाटल, लॉस ऐन्जेलिस, कोलम्बस, हडसन आणि डल्लास या शहरांमध्ये सुद्धा शोजचे आयोजन करण्यात आले आहे. असाच एक शो कतार मध्ये सुद्धा झाला आणि त्याला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.या चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी विशेष परिश्रम घेऊन आपले वजन त्या दोघींनी चक्क वाढवले आणि चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर परत कमीही केले. शिवाय या दोघींच्या दमदार अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या बरोबर सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील आणि चेतन चिटणीस यांचाही चित्रपटातील अभिनय उल्लेखनीय आहे. चित्रपटाचं संगीत सुद्धा उल्लेखनीय असून प्रेक्षकांना ते मनापासून आवडते आहे .