मराठी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. समाजातील अनेक मुद्यांवर हेमांगी तिचं मत अगदी परखडपणे व्यक्त करताना दिसते. हेमांगीने केलेल्या 'बाई, बुब्स आणि ब्रा' या पोस्टची बरीच चर्चा रंगली होती. या पोस्टमुळे अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं. हेमांगी कवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या पोस्टनंतर तिला आलेल्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे.
'बाई, बुब्स आणि ब्रा' या पोस्टनंतर हेमांगीला एका चाहत्याचा फोन आला होता. 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हेमांगीने याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "आम्ही शहरात राहतो, शिकलेले आहोत. पण, आम्ही आमच्या बहिणी व बायकोकडे या नजरेने कधी पाहिलंच नाही. मी माझी बहीण व बायकोला कायम चुकीचं समजत आलो. तुम्ही वजन कमी करा. तुम्हाला ब्रा साइज कोणती घ्यायची, हे कळत नाही का, असं मी त्यांना म्हणायचो.कारण, बाहेरच्या जगात मुलींना बिनधास्तपणे फिरताना पाहून आमच्याच बायकांमध्ये प्रॉब्लेम आहे, असं वाटायचं."
"आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."
"तुमच्या एका पोस्टमुळे माझ्या बहीण आणि बायकोसारखे एका वस्त्रामुळे इतर मुलींनाही प्रॉब्लेम असू शकतात, हे जाणवलं. एका अंतवस्त्रामुळे आमच्या नात्यात दुरावा आला होता, असं सांगताना तो अक्षरश: रडत होता. एका वस्त्रामुळे तो बायकोबरोबर भांडत होता," असंही हेमांगी पुढे म्हणाली.
"माझ्या प्रत्येक घरात शिवरायांचा फोटो असेल, कारण...", 'पावनखिंड' फेम अभिनेत्याचं वक्तव्य
हेमांगीने आजवर अनेक मालिका, नाटक व चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. हेमांगी तिच्या पोस्टमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते.