Join us

"गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो!", श्वानाला मारतानाच्या 'त्या' व्हिडिओवरुन हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:46 AM

समाजातील अनेक घडामोडींवर आणि न पटणाऱ्या गोष्टींवर हेमंत ढोमे त्याचं स्पष्ट शब्दांत मत मांडतो. आतादेखील काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत त्याने संताप व्यक्त केला आहे. 

हेमंत ढोमे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. 'झिम्मा', 'बघतोस काय मुजरा कर', 'झिम्मा २', 'ये रे ये रे पैसा २' असे सुपरहिट सिनेमे त्याने सिनेसृष्टीला दिले. अभिनयाबरोबरच हेमंत त्याच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीही ओळखला जातो. समाजातील अनेक घडामोडींवर आणि न पटणाऱ्या गोष्टींवर हेमंत ढोमे त्याचं स्पष्ट शब्दांत मत मांडतो. आतादेखील काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत त्याने संताप व्यक्त केला आहे. 

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एक व्यक्ती ठाण्यातील क्लिनिकमध्ये कुत्र्याला मारताना दिसत होता. अनेक सेलिब्रिटींनी हा व्हिडिओ शेअर करत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी मयुर आडाव आणि प्रशांत गायकवाड या दोन व्यक्तींना दाब्यात घेत पोलिसांनी FIR दाखल केला होता. पण, त्यानंतर त्यांच्याकडून ५० रुपये दंड घेऊन सोडून देण्यात आलं. याबाबत स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे या पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

पोलिसांनी सोडून दिल्यानंतर ते दोघेही पळून गेल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. ही पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे. 

हेमंतने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. "लोक सहज सुटून पळू शकतात...गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो", असं हेमंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. हेमंतची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताकुत्रासेलिब्रिटी