Join us

हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? बॉक्स ऑफिसचे आकडे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:36 IST

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, जाणून घ्या (fussclass dabhade)

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमा काल २४ जानेवारीला रिलीज झाला. मराठी कलाकारांची फौज असलेला हा मल्टिस्टारर सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. 'फसक्लास दाभाडे' सिनेमाची गाणीही सध्या ट्रेंडिंगवर आहेत. 'फसक्लास दाभाडे' सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी थिएटर हाउसफुल्ल केलेली दिसत आहेत. 'फसक्लास दाभाडे'च्या पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय.

'फसक्लास दाभाडे'ची पहिल्या दिवसाची कमाई

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टमध्ये 'फसक्लास दाभाडे'ची पहिल्या दिवसाची कमाई पाहायला मिळतेय. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने भारतात जवळपास २८ लाखांचा व्यवसाय केलाय. तर जगभरात सिनेमाने ३१ लाख कमावले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'फसक्लास दाभाडे' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचं दिसतंय. 

स्वस्त तिकिटाचा मस्त फायदा

'फसक्लास दाभाडे' सिनेमाचं तिकिट पहिल्याच दिवशी काही ठिकाणी ११२ रुपये होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी 'फसक्लास दाभाडे' पाहायला प्रेक्षकांनी सहकुटुंब हजेरी लावली. त्यामुळे पहिल्याच दिवशी स्वस्त तिकिटांचा सिनेमाच्या कमाईवर फायदा झाला असं म्हणता येईल. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, उषा नाडकर्णी, राजन भिसे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :Hemant Dhome Today Newsसिद्धार्थ चांदेकरअमेय वाघमराठी चित्रपट