Join us

Hemant Dhome : आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा...? मराठी सिनेमा अन् हेमंत ढोमेची खरमरीत पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:13 AM

Hemant Dhome : मराठमोळा दिग्दर्शक व हेमंत ढोमे त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. त्याच्या  पोस्ट लक्ष वेधून घेतात. सध्या त्याची एक अशीच पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठमोळा दिग्दर्शक व हेमंत ढोमे (Hemant Dhome) त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. त्याच्या  पोस्ट लक्ष वेधून घेतात. सध्या त्याची एक अशीच पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये हेमंत ढोमेनं मोजक्या शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. मराठी चित्रपट आणिबॉक्स ऑफिसबद्दलची त्याची एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. त्यानं काही स्क्रिनशॉट शेअर करत, आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 मराठी  चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना अचानक मराठी सिनेमाचे शो कॅन्सल केले जात आहेत. यावर त्याने खरमरीत ट्वीट केलं आहे.

 ‘आपल्या अजून एका प्रेक्षकाबरोबरही तोच प्रकार घडला... तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय... SM5 kalyan मधला हा प्रकार... प्रेक्षक जात असूनही चित्रपट असा डावलला जाणं चूक की बरोबर?’, असं पहिलं ट्वीट त्याने केलं आहे.

‘दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत?,’ असा सवाल त्याने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये केला आहे.

मराठी चित्रपटांना प्रेक्षक असतानाही केवळ हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन दिल्या जात आहे. हा मराठी चित्रपटसृष्टीवर अन्याय असल्याचं मत एकप्रकारे त्याने या ट्वीटमधून व्यक्त केलं आहे.  

कालही या परिस्थितीकडे हेमंतने लक्ष वेधलं होतं. ‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी...या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे...शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसºया दिवशी निघतोय...लोक ‘सनी’ या सिनेमाची तिकीटं काढत आहेत. पण शोज कॅन्सल केले जात आहेत,’असं त्याने म्हटलं होतं. मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच,अशी मागणीही यानिमित्ताने त्याने पुढे रेटली होती.

हेमंत ढोमेनं दिग्दर्शित केलेला  सनी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. त्याच बरोबर चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख यांच्याही  महत्वपूर्ण भूमिका आहेत.  

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटसिनेमासेलिब्रिटी