Join us

“चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे काही फोटो”, मुंबई-गोवा महामार्गाचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:06 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट, म्हणाला, "आपल्या रागाचं रूपांतर...",

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर हेमंत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. अगदी परखडपणे हेमंत त्याचं मत मांडताना दिसतो. मुंबई-गोवा महामार्गाचे फोटो शेअर करत त्यांची विदीर्ण झालेली अवस्था दाखवत हेमतंने ट्वीट केलं आहे.

हेमंतने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या खड्ड्यांची तुलना त्याने चंद्रावरील खड्ड्यांशी केली आहे. “चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!”, असं म्हणत हेमंतने ट्वीटमधून संताप व्यक्त केला आहे. हेमंतच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या ट्वीटवर कमेंट करत चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सनी देओलचा ‘गदर २’ पाहून चाहते नाराज, म्हणाले, “दिग्दर्शकाच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी...”

रितेश देशमुखच्या ‘वेड’चा गिनीज बुक रेकॉर्ड! अभिनेता म्हणतो, “हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही...”

दरम्यान हेमंतने ‘क्षणभर विश्रांती’, ‘चोरीचा मामला’, ‘ऑनलाईन बिनलाइन’, ‘पोस्टर गर्ल’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या फकाट चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने ‘झिम्मा’, ‘सनी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता हेमंतच्या ‘झिम्मा २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. हेमंतने २०१२ साली क्षिती जोगशी विवाह करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्याची पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री आहे. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटात क्षितीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलीआहे.

 

 

टॅग्स :मराठी अभिनेतामुंबईगोवा