कोरोनाने स्थिती बिकट झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रूग्णालयात बेड मिळत नाहीयेत. औषधांची कमतरता आहे आणि त्यातच लसींचाही तुटवडा भासतोय. सध्या 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लस (Corona vaccine) दिली जात आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण लसीकरणाचे चित्र काय, तर लसीकरणासाठी अनेक ठिकाणी उन्हातान्हात, कोरोनाचा धोका पत्करत रांगा लागल्या आहेत. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. इतके करूनही लस मिळेलच याची शाश्वती नाहीये. अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी याबद्दल संतप्त पोस्ट लिहिली आहे.लसीकरण केंद्रावरची गर्दी आणि यामुळे सामान्यांना सोसावा लागत असलेला त्रास यावर भाष्य करणारी जळजळीत पोस्ट त्याने शेअर केली आहे.
या पोस्टबाहेर लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून उभ्या असलेल्या लोकांचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. या फोटोंत मुंबईतील एका लसीकरण केंद्राबाहेर लोक लस मिळावी यासाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.हेमंतची ही पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.