हेमंत पाहतोय सरप्राईजची वाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 10:19 IST
सरप्राईज कोणाला आवडत नाही हो. सरप्रायईजचे नुसते नाव जरी काढले तरी भुया उंचावतात अन ...
हेमंत पाहतोय सरप्राईजची वाट
सरप्राईज कोणाला आवडत नाही हो. सरप्रायईजचे नुसते नाव जरी काढले तरी भुया उंचावतात अन पोटात गोळा येऊन क्युरिओसिटी वाढु लागते कि आपल्याला काय मिळणार आहे. त्यातही वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज मिळाली कि मग काही विचारुच नका दिवस बनला म्हणुनच समजा. असेच काही झाले आहे सगळ््यांचा लाडका हिरो हेमंत ढोमे याच्यासोबत. हेमंतचा आज वाढदिवस असुन त्याचे सर्व फ्रेन्ड्स त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण हेमंत मात्र दुसºयाच प्रतिक्षेत आहे. सीएनएक्सने हेमंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा त्याने वाढदिवसाचे पल्ॅनिंग सीएनएक्ससोबत शेअर केले. हेमंत म्हणतोय, आज मी सुट्टी घेतली आहे. आजचा वेळ फक्त माझ्यासाठी अन फॅमिलीसाठी. मला माहितीये क्षिती मला काहीतरी सरप्राईज देणार या गोष्टी तिला बरोबर जमतात. मी फक्त त्या सरप्राईजची वाट पाहतोय. नक्कीच हेमंत तुला काहीतरी भन्नाट सरप्राईज क्षितीकडुन मिळो अशीच अपेक्षा आपण करुयात.