हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित आणि लिखित 'फसक्लास दाभाडे' (Fassclass Dabhade Movie) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, मिताली मयेकर, राजश्री भावे, राजन भिसे हे कलाकार मंडळी आहेत. हा चित्रपट पाहून बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. आता अभिनेता संतोष जुवेकरने देखील हा चित्रपट पाहून त्यावर प्रतिक्रिया दिलीय.
संतोष जुवेकरने इंस्टाग्रामवर फसक्लास दाभाडेचे पोस्टर शेअर करत लिहिले की, अरे तुम्ही "फर्स्टक्लास दाभाडे" पाहिला का? अरे जा आणि बघा सिनेमागृहात.... धम्माल आहे!!!! सगळे कसे वेडे आणि कसे प्रेमाखुळे आहेत ते बघा. साला आपल्याला एक अशी बहीण आणि असे दोन वेड..... वे भाऊ पाहिजेत आयुष्यात आणि दाजी तर बोनस.
सिनेमाने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई 'फसक्लास दाभाडे'चा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टमध्ये सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहायला मिळतेय. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'फसक्लास दाभाडे'ने भारतात जवळपास २८ लाखांचा बिझनेस केलाय. तर जगभरात सिनेमाने ३१ लाख कमावले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'फसक्लास दाभाडे'ला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचे दिसते आहे.
संतोष जुवेकर वर्कफ्रंटसंतोष जुवेकर लवकरच विकी कौशलच्या छावा या सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात संतोष रायाजी या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोषला विकी कौशल आणि रश्मिका मंदानासोबत काम करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.