Join us

'अमलताश' मध्ये कशी झाली राहुल देशपांडेंची एन्ट्री? दिग्दर्शक सुहास देसले म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 4:52 PM

या सिनेमात राहुल देशपांडे यांना मुख्य भूमिकेत घेण्याची कल्पना कशी सुचली हे सुहास देसले यांनी सांगितले. 

प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा 'अमलताश' (Amaltash) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात त्यांनी स्वतः भूमिका साकारली आहे. सुहास देसले यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'अमलताश' ही एक हलकीफुलकी लव्हस्टोरी आहे. या सिनेमात राहुल देशपांडे यांना मुख्य भूमिकेत घेण्याची कल्पना कशी सुचली हे सुहास देसले यांनी सांगितले. 

'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुहास देसले म्हणाले, "मी राहुलसोबत खूप काळ घालवला आहे.  त्याच्यासोबत वेळ घालवतानाच लक्षात येतं की तो त्या कॅरेक्टरमध्ये फिट होईल. त्याला  हे जमणार नाही असं कधीच वाटलं नाही. कथा लिहितानाच प्रत्येक अक्षर राहुलला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिण्यात आलं होतं. तोच डायलॉग बोलतोय असं दिसायचं. तो या भूमिकेसाठी योग्यच होता."

'अमलताश' या सिनेमात राहुल देशपांडे यांच्याशिवाय पल्लवी परांजपे, दीप्ती माटे, अनिल खोपकर यांचीही भूमिका आहे. सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित झालं तेव्हापासूनच सिनेमाबाबतीत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. हा सिनेमा एक हलकीफुलकी लव्हस्टोरी आहे. संगीत आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची घातलेली  सांगड या सिनेमात पाहायला मिळणार आहे. दर्शकांसाठी ही उत्कृष्ट सांगितिक मेजवानी ठरणार आहे.

2018 ला मामी फिल्म फेस्टिवल मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे ज्यांनी हा सिनेमा बघितला त्यांनी राहुल देशपांडेंच्या अभिनयाचं आणि सिनेमातील गाण्याचंही भरभरुन कौतुक केलं आहे.

टॅग्स :राहुल देशपांडेसंगीतमराठी चित्रपटमराठी अभिनेता