बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या रिमा लागू (Reema Lagoo) यांची आज जयंती आहे. १८ मे, २०१७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक टीव्ही कार्यक्रमांशिवाय रिमा यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. रिमा लागू यांना चित्रपटातील आईच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.
२१ जून १९५८ रोजी मुंबईत जन्मलेल्या रिमा लागू यांना लहानपणापासूनच अभिनयाची गोडी लागली होती. खरे तर त्यांची आई मंदाकिनी खडबडे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या. अशा परिस्थितीत रिमा यांचा अभ्यासादरम्यान अभिनयाकडे कल वाढू लागला. त्याच वेळी, हायस्कूलनंतर, त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर रिमा यांनी १९८० मध्ये कलियुग या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रिमा यांचे खरे नाव नयन भडभडे होते. तथापि, अभिनयाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी १० वर्षे बँकेत काम केले.
ओळख, प्रेम, लग्न आणि मग नात्यात आला दुरावा
अभिनयादरम्यान रिमा यांची ओळख मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी झाली. भेटीचा कालावधी वाढल्यावर दोघांमध्ये प्रेम फुलू लागले आणि दोघांनी लग्न केले. यानंतर अभिनेत्रीने तिचे नाव बदलून रिमा लागू केले. लग्नानंतर काही काळ सगळे सुरळीत चालले, पण नंतर रिमा आणि विवेक यांच्यात दुरावा निर्माण झाला. अशा परिस्थितीत दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगी असून जिचे नाव आहे मृण्मयी लागू.
अशी झाली सिनेमाची 'आई'रिमा पहिल्यांदा १९८८ मध्ये आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटात जुही चावलाची आई बनली होती. यानंतर तिने १९८९ मध्ये ‘मैने प्यार किया’ आणि १९९१ मध्ये ‘साजन’ या चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटांमुळे रिमा घराघरात प्रसिद्ध झाल्या. तसेच आधुनिक काळातील आईची भूमिका त्यांच्यापेक्षा चांगली कोणीच करू शकत नाही हेही सिद्ध झाले.
मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत करत होत्या कामरिमा लागू त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत शूटिंग करत होत्या. संध्याकाळी त्या घरी परतल्या आणि मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.