Join us

हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादीच्या 'सर्किट' चित्रपटातलं 'वाजवायची सानकन' गाणं आलं भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 18:37 IST

हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या 'सर्किट' या चित्रपटातलं "वाजवायची सानकन ' हे गाणं लाँच करण्यात आलं आहे.

हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या 'सर्किट' या चित्रपटातलं "वाजवायची सानकन ' हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. रॅप शैलीचं हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलं असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे लिहिले आहे. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 

पटकन संतापणाऱ्या तरुणाची गोष्ट 'सर्किट' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुऴे या भूमिकेला साजेसं असं 'वाजवायची सानकन' हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन केलेल्या आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजातील "काहीसा बावरतो, काहीसा सावरतो' या रोमँटिक गाण्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. त्यामुळे आता  रफटफ आणि अॅक्शनपॅक्ड असं  'वाजवायची सणकन' हे गाणंही प्रेक्षकांची दाद मिळवेल यात शंका नाही.

टॅग्स :ऋता दूर्गुळेवैभव तत्ववादी