Join us

पालवीच्या प्रेमात पडलीय पब्लिक फुल्ल...! ‘Timepass 3’च्या टीझरला 24 तासांत 1M व्ह्यूज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 4:22 PM

Timepass 3 Teaser : टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर  ‘टाईमपास 3’ येतोय. काल या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि हा टीझर चाहत्यांना जणू वेड लावून गेला.

आपल्या दोस्ताला जो नडेल, त्याचा आपण मार्बल फोडेल... मनाचा डोअर ओपन ठेवला की ज्ञानाचा लाईट कधी कुठून कसा येईल सांगता येत नाही... असे एकापेक्षा एक भन्नाट डायलॉग आणि वेगळ्या अंदाजातील हृता दुर्गळेला (Hruta Durgule) पाहून पब्लिक फुल्ल क्रेझी झाली आहे. होय, आम्ही बोलतोय ते ‘टाईमपास 3’ (Timepass 3 ) या आगामी मराठी चित्रपटाच्या टीझरबद्दल.टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर  ‘टाईमपास 3’ येतोय. काल या सिनेमाचा टीझर (Timepass 3 Teaser) रिलीज झाला आणि हा टीझर चाहत्यांना जणू वेड लावून गेला. इतका की, या टीझरला फक्त 24 तासांत  1 M व्ह्युज मिळाले आहेत.

 हृताने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.  ‘पालवीची स्टाईल जितकी कडक तितकाच टाईमपास 3 च्या टीझरचा जलवा पण बेधडक़.. 1M व्ह्यूज झालेत ना पब्लिक ते पण फक्त 24 तासांत... येतेय पालवी आणि दगडूची गोष्ट  टाईमपास 3... 29 जुलै 2022 पासून सर्व चित्रपटगृहांत,’असं ही पोस्ट शेअर करताना हृताने लिहिलं आहे.

‘टाईमपास 3’मध्ये हृता पालवीची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. साहजिकच, टीझर रिलीज झाल्यापासून सगळीकडे हृताच्या रावडी लुकची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांना ह्रताचा रावडी अंदाज भलताच आवडला आहे.   

 अशी आहे ‘टाईमपास 3’ची कथाटाईमपास आणि टाईमपास 2 मध्ये आपण दगडूच्या लहानपणी टाईमपास म्हणून झालेल्या लव्हपासून लग्नाच्या लोच्यापर्यंतची गोष्ट पाहिली. पण ‘टाईमपास 3’मध्ये त्याआधीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. होय, टाइमपास 3 ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे. कुमारवयाच्या दगडूच्या आयुष्यात पालवी दिनकर पाटील नावाचा ट्विस्ट आहे आणि तिचीच कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  प्रथमेश परब या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत आहे आणि वैभव मांगले हा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र साकारतो आहे.  

टाइमपास 3 ची घोषणा झाल्यापासूनच्या सिनेमात प्राजू दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.टीझरमध्ये तरी  प्राजू दिसलेली नाही. पण ती दिसणार की नाही, याचं उत्तर येत्या काही दिवसांत तुम्हाला नक्की मिळणार आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळेसिनेमा