Join us

'घर होतं मेणाचं’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 8:00 AM

पहिल्या आठवडयातच या चित्रपटाने रसिकांच्या मनांत दमदार एंट्री केलेली आहे. तिकिटबारीवर सध्या ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकवणारा ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रसिकांचे विशेष आकर्षण ठरलं आहे.

ठळक मुद्दे संगीतसम्राट अशोक पत्की यांची सुरेल गाणी एकंदरीतच सर्व जमेच्या बाजू ठरली आहे हाऊसफुल्लच्या मांदियाळीत ‘घर होतं मेणाचं’ या चित्रपटाने दमदार पदार्पण केलं आहे

 गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटगृहांच्या तिकिटबारीवर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकू लागले आणि त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्याची लाट सळसळू लागली. मराठी चित्रपटांचे वेगवेगळे विषय, त्यांची मांडणी, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद याची दखल बॉलीवूडलाही घेणे आता भाग पडत आहे. या नवचैतन्याच्या लाटेत श्री सिद्धि गणेश फिल्म्स निर्मित व श्री ज्ञानदेव शेटे प्रस्तुत ‘घर होतं मेणाचं’ हा अतिशय सुंदर चित्रपट दाखल झाला आहे. प्रदर्शित होताच पहिल्या आठवडयातच या चित्रपटाने रसिकांच्या मनांत दमदार एंट्री केलेली आहे. तिकिटबारीवर सध्या ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकवणारा ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रसिकांचे विशेष आकर्षण ठरलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे उत्कृष्ट कथानक, मोहन जोशी, अलका कुबल, सिद्धार्थ जाधव, अविनाश नारकर सारख्या दिग्गज कलाकारांचा अप्रतिम अभिनय, दिग्दर्शक राजेश द. चव्हाण यांचे कलात्मक दिग्दर्शन आणि या जोडीला संगीतसम्राट अशोक पत्की यांची सुरेल गाणी एकंदरीतच सर्व जमेच्या बाजू सुंदर जमून आल्याने एक सर्वांगसुंदर कलाकृती या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांसाठी पर्वणी ठरली आहे.

                चित्रपटातील संवाद, गाणी व कलाकारांचा अभिनय याबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या विषयाचं वेगळेपण याबाबत रसिक भरभरून कौतुक करीत आहेत. अलका कुबल यांच्या अभिनय कारकिर्दातील एका अतिशय वेगळया भूमिकेचे विशेषतः महिला प्रेक्षक खूपच कौतुक करताना दिसतात. तसेच मोहन जोशींनी साकारलेल्या वेगवेगळया भूमिका प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. संगीतकार अशोक पत्कींनी पुन्हा मेलडीची जादू करून गाण्यांमध्ये आगळीच किमया केलेली आहे. निर्माते नितिन ज्ञानदेव शेटे व ज्ञानेश्वर ढोके यांनी महाराष्ट्रातून रसिकांचे या चित्रपटाला मिळणारे प्रेम व उदंड प्रतिसाद पाहून रसिकांचे शतशः आभार मानले आहेत. परंतु त्या सोबतच हा चित्रपट महाराष्ट्रातील अधिकाधिक रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी थिएटर मालकांनी चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचे आवाहन निर्माते करीत आहेत. एकंदरीतच हाऊसफुल्लच्या मांदियाळीत ‘घर होतं मेणाचं’ या चित्रपटाने दमदार पदार्पण केलेले आहे त्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टिमला शुभेच्छा. 

टॅग्स :अलका कुबलमोहन जोशी