मराठी कलाविश्वातील अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही क्षेत्रात डंका गाजवत आहे. प्रसाद आगामी 'धर्मवीर २' चित्रपटामुळेही चर्चेत आहे. तसेच तो महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परिक्षक आहे. आज त्याचा वाढदिवस असून त्या निमित्ताने त्याची पत्नी मंजिरी ओक हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
मंजिरी ओक हिने इंस्टाग्रामवर प्रसाद ओकसोबतचा फोटो शेअर केला आहे. यात मंजिरीच्या तोंडावर मास्क आहे. तिने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी अशी वागेन , गप्प बसेन , तुला बोलू देईन ,मी फक्त ऐकेन. तर जागा हो . फोटो आहे तो, मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते …तुला पर्याय नाही. ओह सॉरी सॉरी आज चांगलं बोलायचं असतं ना ? ओके ओके. आय लव्ह यू. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. हॅप्पी बर्थडे.