Join us

मला कवी होण्याची घाई नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2016 11:58 AM

             फॅन्ड्री ... नटरंग... परतू .. रेती अशा कितीतरी चित्रपटांमध्ये वेगळ््या धाटणीचा अभिनय साकारणारे ...

             फॅन्ड्री ... नटरंग... परतू .. रेती अशा कितीतरी चित्रपटांमध्ये वेगळ््या धाटणीचा अभिनय साकारणारे किशोर कदम आता गणवेश या सिनेमातून एका दमदार भुमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. याच चित्रपटातील त्यांच्या भुमिकेविषयी त्यांनी सीएनएक्ससोबत साधलेला हा मनमोकळा संवाद   गणवेशमधील तुमच्या भुमिकेविषयी काय सांगाल ?-:  गणवेश या सिनेमामध्ये माझी एक वेगळी भुमिका आहे. यामध्ये स्मिता माझ्या बायकोचा रोल करीत आहे. परंतू ही फक्त आमच्या दोघांचीच गोष्ट् नाही. तर त्यामध्ये एका छोट्या मुलाची कहाणी आहे, मुक्ताची गोष्ट आहे, दिलीप प्रभावळकर यांची कथा आहे.  म्हणजेच, एकाच शहरात राहणाºया प्रत्येक माणसाची एक गोष्ट आहे. ओळखीची माणसे कधी एकत्र येऊन आपल्या गोष्टी घेऊन एकत्र येतात अन त्यांचीच ही कहाणी आहे.   गणवेशमध्ये तुमच्या भुमिकेत वेगळे असे काय आहे ? - : फॅन्ड्रीमध्ये तो बाप आहे अन यातही तो एक बाप आहे. परंतू दोघे वेगळे आहेत. हा सिनेमा करताना मला माझ्या वडिलांची आठवण आली. कारण लहानपणी साधा गणवेश घेण्यासाठी माझ्य वडिलांना किती त्रास झाला असेल, त्यांना झालाले त्यावेळचा त्रास काय असेल हा विचार करुन मी यातील बापाचा त्रास दाखविण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट केला नसता तर मला पुन्हा माझ्या बालपणला रिव्हीजीट करता आले नसते.  कवी अन अभिनेता असताना एखाद्या चित्रपटाचे गीत आपण लिहावे असे वाटले का?-: नटरंग मधील गाणी  ऐकुन मला वाटले यातील गाणी आपण लिहायला पाहिजे होती. गुरु माझा चांगला मित्र आहे.  गुरुने लिहीलेल एखाद गाण ऐकुन माझ्यात एक पॉझिटिव्ह असुया निर्माण होते की हे असे मला का नाही सुचले. आमच्यात एक हेल्दी कॉम्किटीशन आहे. चित्रपटा करीता कविता लिहण्यासाठी आॅफर्स येतात का ?-: हो येतात.. मी कविता लिहीतोच आता माझा दुसरा कविता संग्रह येत आहे. बाऊल नावाचा. आता हा दहा  वर्षांनी येतोय. दरवर्षी आपल्याकडे एक कविचा  कवितासंग्रह प्रकाशित झाल्याशिवाय तो कवी आहे समजत नाहीत.  मी एकाच पुस्ताकाने बºयापैकी सर्वांना माहित झालो आहे. कवी होता येत नाही. कवी असतो किंवा नसतो. मला कवी होण्याची घाई झालेली नाही.  मास अन क्लास साठी चित्रपट आहेत असे वाटते का तुम्हाला ?-: सिनेमा चांगला असतो किंवा वाईट. तो कोण करतो अन कसा करतो यावर ते डिपेन्ड असते. मास अन क्लास हे ढोबळ वर्गीकरण करु नये. किती अशा चांगल्या फिल्म आहेत ज्या लो बजेट मध्ये बनल्या अन चालल्या. त्यामुळे असे वर्गीकरण करु नये.