तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होता. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. आता काय तर, प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर प्रपोजल येऊ लागले आहेत. होय, एका चाहत्यानं प्राजूला चक्क प्रपोज केलं आहे.प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि ते फोटो पाहून चाहते जणू तिच्या प्रेमात पडले. एक चाहत्याने पुढे येत चक्क प्राजक्तावरच्या प्रेमाची जाहीर कबुलीच दिली.
प्राजक्ताने जांभळ्या रंगातील ड्रेसमधले दोन सुंदर फोटो शेअर केलेत.‘इतरांच्या सावलीखाली राहण्यापेक्षा मी नेहमीच काळोख्या वाटेवर एकटीने चालेल,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. तिचे हे फोटो आणि तिची पोस्ट वाचून चाहते तिच्यावर फिदा झालेत. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे प्रतीक महिला सशक्तीकरण आणि सशक्तीकरण आणि मजबूत व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राची सामाजिक परंपरा... ब्यूटी क्वीन... मी पण तुझ्यावर प्रेम करतो...,’ असं लिहित एका चाहत्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली. या चाहत्याच्या या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं.
अन्य एका चाहत्याची कमेंटही लक्षवेधी ठरली. ‘हो माहितीये तू खूप खूप स्ट्राँग आहेस. पण तू एकटी नसणार कारण अंधारात नीट दिसावं म्हणून तुझ्या मागे मी एलईडी टॉर्च घेऊन चालत राहिल,’ अशी कमेंट या चाहत्याने केली. अन्य एका चाहत्यानेही ‘आय लव्ह यू प्राजू’ म्हणत आपलं प्रेम व्यक्त केलं. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो प्रिये,’असं लिहित एका चाहत्याने प्राजक्तावरच्या प्रेमाची कबुली दिली. आरररररररररररररररररर, माझ्याकडे बघतेय राव ती, अशी मजेशीर कमेंट अन्य एका चाहत्याने केली. एकंदर काय तर सगळेच प्राजक्ताच्या प्रेमात पडते.
प्राजक्ताच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर प्राजक्तानं नुकतीच लंडनहून नव्या सिनेमाचं शुटींग संपवून आली आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम होस्ट करत आहे.