Join us  

"मला पोलिस अधिकारी बनायचं होतं पण...", आकाश ठोसरनं केला वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 5:53 PM

Aakash Thosar : आकाश ठोसर म्हणाला, माझं लहानपणपासूनच स्वप्न होतं पोलिस व्हायचं होते.

'सैराट' फेम नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) सिनेमा म्हणलं की काहीतरी हटके असणार यात शंका नाही. आता तो 'घर बंदुक बिरयानी' हा सिनेमा घेऊन येत आहे. यामध्ये सर्वांचा लाडका परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) मुख्य भूमिकेत आहे. ‘सैराट’ काय मिळाला आणि आकाशचं नशीब एका रात्रीत बदललं.परशा उर्फ आकाश ठोसरचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे २४ फेब्रुवारी १९९३ रोजी एका सामान्य कुटूंबात झाला.आकाशने पुण्याच्या एस पी एम मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुणे विद्यापिठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पण पूर्ण केले.  

लवकरच आकाशचा घर, बंदूक, बिरयानी (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आकाश सध्या बिझी आहे. यावेळी आकाशे एक त्याच्या करिअर विषयी बोलताना खुलासा केला आहे. आकाश ठोसरने लोकमतच्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती

यावेळी बोलताना आकाश म्हणाला, मला पोलिस अधिकारी बनायच होते. मी MPS ची तयारी करत होतो. मी दोन वेळा पोलिस भरतीला गेलो होता. आर्मी भरतीला गेलो होतो. आजही अभिनेता नसतो तर कदाचित कुठल्यातरी पोस्टवर असतो. मला आवडतं अजूनपण आजही सकाळी रनिंगला जातो तिथं  पोलिस भरतीची मुलं सराव करत असतात गोळा फेक वैगरे मी जाऊन आताही त्यांच्यात सराव करतो. मला आवडतं माझं लहानपणपासूनच स्वप्न होतं पोलिस व्हायचं.

  आकाश ठोसरच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे   ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत.  सयाजी शिंदेचा रावडी आणि तडफदार अंदाज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आकाशचा रोमान्स अर्थातच आहे. तो या चित्रपटात एका रोमॅन्टिक अंदाजात दिसणार आहे.
टॅग्स :आकाश ठोसरसेलिब्रिटी