Join us

Sonali Kulkarni :- 'आता खपवून घेणार नाही..', लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीनं दिलं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:17 AM

I will not tolerate it now Sonali Kulkarni gave a scathing reply to the trolls from the wedding : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच कुणाल बेनोडेकर सोबत दुबईत लग्नबेडीत अडकली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच फियॉन्से कुणाल बेनोडेकर सोबत दुबईत लग्नबेडीत अडकली आहे. तिने ७ मे रोजी लग्न केले आणि तिच्या वाढदिवसादिवशी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली. लग्नाचे वृत्त समजताच तिच्या चाहत्यांकडून, जवळच्या मित्र परीवारांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. पण काही युझर्सनी लग्नाच्या पोस्टनंतर काहीच क्षणानंतर तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यावर सोनालीनेही त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. I will not tolerate it now Sonali Kulkarni gave a scathing reply to the trolls from the wedding

सोनाली कुलकर्णीच्या ट्विटर अकाउंटवर तिला अनेक कमेंट्स आल्या तर त्यातील काही या विनाकारण वैयक्तिक बाबींत नाक खुपसणाऱ्या आणि टीका करणाऱ्या होत्या. त्यात एका युझरने केलेल्या टिकेवर सोनालीने लिहिले की, ‘तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता...हे आता खपवून घेणार नाही. किमान मी तरी नाही. समाजभान ठेऊन वागणे, समाजाला देणे लागणे, देऊ करणे, जबाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणुसकी जपणे... हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अश्या फुकट कमेंट्स टाकायच्या.’

तसेच दुसऱ्या एका युझरने सोनालीला ट्रोल करत लिहीले की, ‘परदेशात मजा करत आहेत. कोरोनासाठी मदत करा.’ यावर सोनालीने उत्तर देत म्हटले, ‘खरचं???  तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही, म्हणून आम्ही काही केलंच नाही, किंवा करतंच नाही, असे होत नाही. मी काय मदत केलीये ती बोंबलून सांगणे मला तरी योग्य वाटत नाही असो, सगळ्यांना एकाच पठडीत बसवणे चुकीचे आहे.

नुकतीच कुणाल बेनोडेकरसह दुबईत सोनाली लग्नबंधनात अडकली. वाढदिवसाच्या दिवशी लग्न झाल्याची बातमी चाहत्यांसह शेअर करताच शुभेच्छांचा वर्षाव झाला.

पहिल्या लॉकडाऊन दरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीदुबईकोरोना वायरस बातम्या