मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणजे अशोक सराफ. अशी ही बनवाबनवी, गंमतजंमत, बाळाचे बाप ब्रह्मचारी, धुमधडाका असे कितीतरी गाजलेले हिंदी, मराठी सिनेमा त्यांनी कलाविश्वाला दिले. विशेष म्हणजे त्यांचं त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. त्यामुळे अनेकदा त्यांचं कामाप्रतीचं प्रेम दिसून येतं. अभिनेता मिलिंद गवळी यांनी अलिकडेच एक पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचा एक किस्सा शेअर केला आहे.
अशोक सराफ यांनी जवळपास ५ दशकाहून अधिक काळ कलाविश्वात काम केलं आहे. त्यामुळे आज त्यांचा मराठी सिनेसृष्टीत दबदबा असल्याचा पाहायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी त्यांना एक आजार झाल होता, ज्यामुळे त्यांना बोलता येत नव्हतं. परंतु, मी या क्षेत्रातून कधीच काम सोडणार नाही, असं त्यांनी मिलिंद गवळी यांना सांगितलं होतं. याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टही शेअर केली आहे.
"असेल हरि तर देईल खाटल्यावरी "किंवा "नशिबात असेल तर मला मिळेल" असं म्हणून चालत नाही. तुम्हाला स्वतःला हात पाय हलवावेच लागतात, कष्ट करावे लागतात, जे काही ध्येय गाठायचं असेल, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागतं, आणि असं नाहीये की कोणाला नशिबाने मिळत नाही, किंवा हरी खटल्यावर देत नाही, पण जे काही कष्ट न करता मिळालेलं असतं ते फार काळ टिकतही नाही असा माझा अनुभव आहे, कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो, आणि कष्ट करणे म्हणजे अगदी गदा मजदूरी करणे असे ही नाही. कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचे आहे. कष्ट करणे म्हणजे दिलेल्या वेळा पाळणे, यालाही खूप महत्त्व आहे, punctuality हा शब्दच बऱ्याचशा लोकांच्या dictionary मध्येच नसतो. आणि असं नाहीये की त्यांना यश मिळत नाही, मिळतं त्यांना पण यश मिळतं, खूप यश मिळतं. Punctual नसणारे आणि indiscipline कलाकार उदाहरणार्थ राजेश खन्ना, गोविंदा, शत्रुघन सिन्हा आणि disciplined, punctual कलाकारांमध्ये अमिताभ बच्चनच नाव घेतलं जातं, शशि कपूरचं नाव घेतलं जातं नंतरच्या पिढीतले आमिर खान, अक्षय कुमार यांचं नाव घेतलं, असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला, तुमचं काम कष्टाच वाटत नाही, एकदा मला अशोक सराफ म्हणाले होते की, ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल "अरे यार आज शूटिंग आहे" शूटिंगचा मला कंटाळा येईल, त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन आणि, खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह आसतो, अगदी फिल्मचं किंवा सिरीयलचे शूटिंग असायला पाहिजे असं काही नाही अगदी मग हे आजचं आशय बरोबरच फोटोशूट असलं तरी तो उत्साह काही कमी होत नाही, तसाच उत्साह, तीच positive energy cameraman आशयमध्ये असते, सगळी अरेंजमेंट करणारा श्री मध्ये असते. दर्शना हजारे शानबागने तयार केलेले Costumes press iron करणारा संकेतमध्ये असते, मेकअप करणारा समीर म्हात्रेमध्ये, रुक्सार आणि राजूमध्ये असते, या सगळ्यांची collective, strong, positive energy, magic create करत असते. मग डोक्यावर कडक ऊन असलं तरी, घामाच्या धारा वाहत असल्या तरी, शूटिंग करत असताना मनावर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करत असते असंच वाटतं !"