केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, दिपा चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बाईपण भारी देवा चित्रपटाची कथा सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारीत आहे. दरम्यान सध्या सुचित्रा बांदेकर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतात. त्यामुळे त्या पुर्णपणे दुखावलेल्या असतात. त्यांचा पती त्यांना घटस्फोटाची नोटीसही देतात. अशावेळी त्या काहीकरून आपल्या नवऱ्याला सोडायला तयार नसतात. आपल्या भूमिकेबद्दल त्यांनी मुलाखतीत बरेच काही सांगितले आहे. तसेच ही भूमिका त्या प्रत्यक्षात रिलेट करतात का यावरही त्यांनी भाष्य केले आहे. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आदेश बांदेकर यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर...? यावर त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. त्या म्हणाल्या की, तिची भूमिका बघून मी रिलेट करू शकले पण तिची गोष्ट मी माझ्या आयुष्याशी रिलेट करू शकत नाही.
त्यापेक्षा चौपट मी रिॲक्ट होईन...
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, आदेश खूप चांगला आहे. तो लफडी वगैरे करत नाही किंवा त्या वाट्याला कधी जातही नाही. नाहीतर चित्रपटातील पल्लवी जशी रिॲक्ट झाली आहे त्यापेक्षा चौपट मी रिॲक्ट होईन हे आदेशला माहीत आहे.
'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १० दिवसांत तब्बल २६.१९ कोटींची कमाई केली आहे.