गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात लगीनसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच कोणी लग्नगाठ बांधलीय तर कोणाचा साखरपुडा झाला आहे. त्यानंतर आता टाइमपास सिनेमातील दगडू म्हणजेच प्रथमेश परब(Prathamesh Parab)च्या घरी लगीनघाई आहे. तो लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी त्याचा साखरपुडा करणार आहे. दरम्यान आता त्याच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. तो २४ फेब्रुवारी, २०२४ ला बोहल्यावर चढणार आहे.
प्रथमेश परब हिने इंस्टाग्रामवर लग्नाची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. २४ फेब्रुवारी, २०२४ ला प्रथमेश क्षितीजासोबत लग्नगाठ बांधणार आहे. या पोस्टमध्ये त्याने तारखेची बेरीज केली आहे. त्यातून इन्फिनिटी (अनंत) बनले आहे. त्याने पुढे या पोस्टमध्ये लिहिले की, अनंत कायम आहे, आणि तेच माझ्यासाठी तू आहेस, तूच माझी सदैव आहेस. प्रथमेश परबच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सेलिब्रेटी कमेंटमध्ये त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
प्रथमेश आणि क्षितीजाचा १४ फेब्रुवारीला होणार साखरपुडाप्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांचा १४ फेब्रुवारी रोजी साखरपुडा पार पडणार आहे. क्षितीजाने त्यांच्या एंगेजमेंटच्या तारखेबद्दल सांगत त्यांची लव्हस्टोरीबद्दलही सांगितली होती. ती म्हणाली की, १४ फेब्रुवारी २०२०- माझी व्हॅलेंटाइन डे स्पेशल फोटोशूट सीरिज बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. १४ फेब्रुवारी, २०२१ मध्ये आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. १४ फेब्रुवारी, २०२२ अनेक आठवणींसह रिलेशनशीपला एक वर्ष पूर्ण झालं. १४ फेब्रुवारी २०२३ आमच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर अनाऊंस केलं. १४ फेब्रुवारी २०२४ला आमच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. मग आता काहीतरी स्पेशल केलेच पाहिजे ना!!"