अपूर्ण संकल्प पुर्णत्वास नेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2016 11:15 AM2016-12-26T11:15:09+5:302016-12-26T11:15:09+5:30
नवीन वर्ष आले कि सर्वजणच आनंदात असतात. उत्साहात वनीव वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजणच उत्सुक असतात. मागच्या वर्षात ज्या गोषअटी ...
वीन वर्ष आले कि सर्वजणच आनंदात असतात. उत्साहात वनीव वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजणच उत्सुक असतात. मागच्या वर्षात ज्या गोषअटी केल्या त्या पुढील वर्षात सुधारु असे प्रत्येकालाच वाटत असते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्षात एखादा संपल्प करायचा. पण तो केलेला संकल्प अपण खरच त्या वर्षात पूर्ण करतो का हे एकदा स्वत:ला विचारले पाहीजे. पाहा तर नवीन वर्षाच्या संकल्पा विषायी अभिनेता सुयश् टिळक काय सांगतो. सुयश म्हणतो, संकल्प असा खास काहीच नाही केला आहे. पण सध्यातरी वेगवेवगळी कामं करण्याचा अट्टहास आहे. नव्या मालिका आणि नाटकांचे वाचन सुरु आहे. त्यामुळे सध्या मी व्यग्रच आहे. किंबहुना संकल्पांविषयी बोलायचं झालं तर संकल्प हे फसण्यासाठीच असतात. अर्थात त्यातील काही पूर्णत्वासही जातात. नवीन वर्षांच्या संकल्पांविषयी आपले मत मांडताना सुयश म्हणाला की, ह्ययेत्या वषार्साठी ठराविक असा एखादा संकल्प मी केला नाहीये. पण, तरीही मागच्या वर्षी केलेल्या संकल्पांपैकी जे काही संकल्प अपूर्ण राहिले आहेत ते या वर्षी पूर्णत्वास नेण्याचाच माझा प्रयत्न असेल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही प्लॅन्स असे केले नाहीत. कारण नव्या वर्षाच्या आगमनासोबतच माज्या वाढदिवसाचीही चाहूल लागते त्यामुळे वाढदिवस आणि नववर्ष असं दुहेरी सेलिब्रेशनच असतं म्हणा ना. मला फारसं पार्टी आणि सेलिब्रेट करणं आवडत नाही. त्यामुळे थर्टीफर्स्टच्या दिवशीही माझे काही प्लॅन्स नाहीत. याउलट मी माझ्या कामातच व्यग्र राहण्याला प्राधान्य देईल. हो पण, असं असलं तरीही या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वर्षभराचा ताण काढून टाकण्यासाठी काही निवांत क्षण मलाही हवे आहेत हे नक्की.ह्ण,असे म्हणत सुशांतने त्याच्या नवीन वर्षांच्या प्लॅनवरुन पडदा उचलला आहे.