Join us

भांगडा अन् 'वंदे मातरम'च्या घोषणा! ऑस्ट्रेलियात भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन, मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 11:34 IST

Independence Day 2023 : ऑस्ट्रेलियात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन, मराठी अभिनेत्याने व्हिडिओत दाखवली झलक

देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज देशात सर्वत्र मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहण केलं. परदेशातही भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला. ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनाही तेथे भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. मराठी अभिनेता सुमंत शिंदेने त्याच्या सोशल मीडियावरुन याचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

‘बॉईज’ फेम अभिनेता सुमंत शिंदे सध्या ऑस्ट्रेलियात आहे. सुमंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात झालेल्या भारताच्या स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये भारतीय नागरिक भांगडा करताना दिसत आहे. त्याबरोबरच वंदे मातरम् आणि भारत माता की जय च्या घोषणाही देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिरंगाच्या रंगाच्या फुग्यांनी खास सजावट केल्याचंही फोटोत दिसत आहे. ऑस्ट्रेलियातील भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन पाहून सुमंतही भारावून गेला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, समोर आलं मोठं कारण

सुमंतने २०१७ साली ‘बॉईज’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या सीक्वेलमध्येही त्याने काम केलं आहे. गेल्याच महिन्यात सुमंत ऑस्ट्रेलियाला गेला आहे.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनआॅस्ट्रेलियामराठी अभिनेता